“Hey.”

“Baarish.”

I ping her.

“Yes! ”

“I know!”

She sends me the widest smile emoji there is.

It is ridiculous how my girlfriend is the first thought on my mind whenever it rains, no matter how much I think I have grown up for this kind of shit… I mean stupidity.
And all of them have always been excited about the rains just as much as me – from the crazy types whom I dumped, to the mature types who dumped me.

It is amazing how people who have so much NOT in common, have so much in common at the same time. AND that in spite of this enlightenment, I worry so much whether this one is “the one” or not.

सहवास

ऐन डिसेंबर ची थंडी. तरीही मी साडेसात वाजता उठून आलो होतो. ती हॉस्टेल मधून बाहेर आली. तिने आंघोळ केलेली, मी अंथरुणातून उठून केसही न विंचरता आलेलो. लक्षात आलं असावं, पण ती काही बोलली नाही. वेळच तशी होती.
आम्ही जवळच्या बाकावर उन खात बसलो.
बोलणं chats वर रात्री उशिरा पर्यंत चालूच होतं, आता काय वेगळं बोलणार? पण एकमेकांचा सहवास हवाहवासा.

काही वेळ गेल्यावर तिने, काहीसा नर्व्हस पणे, माझा हात हातात घेतला. “हात किती कोरडे झालेत तुझे थंडीने,” मी म्हणालो, “लाव काही लोशन वगैरे?”
“बोलायलाच हवं असं काही नाहीये,”
“हात धरायलाच हवा असं काही नाहीये,”
तिने पटकन हात सोडवून घेतला अन माझ्या खांद्यावर चापटी मारली.
मी हसलो.
शेजारच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. “Silence is a blank canvas for musicians… that muggles call birds.” ती म्हणाली.
तशी आमची ओळख काही महिन्यांची. पण हे नातं नवीन.
ओल्या केसांनी भिजलेली तिच्या स्वेटरची पाठ सुकेपर्यंत, आम्ही तिथंच कोवळ्या उन्हात बसून होतो. उसना रुसवा आणून नंतर तिने माझा हातही हातात धरला नाही!

नवीन प्रेमाला काही नसणं सुद्धा खूप काही असतं. असं, काही न करता, नुसतं एकमेकांच्या सहवासात बसून राहता आलं, तर अजून प्रेम आहे असं म्हणता येईल.

बाकी सारा व्यवहार…